मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांच्या वतीने अभूतपूर्व स्वागत
नागपूर, दि. १५ : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे आगमनप्रसंगी नागपूरकरांनी विमानतळावर अलोट गर्दी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…
मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा
मुंबई, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी आज मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक…
बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच- कामगार मंत्री आकाश फुंडकर
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येते. तथापि, त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो…