मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधांसाठी निधी देणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, दि.२१ : जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधांसह जल संधारणाच्या कामांना…
राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
मुंबई, २५ : २७-२८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २७ डिसेंबरला…
कर्नाटक विधानपरिषदेच्या विनंती अर्ज आणि सभागृह समितीची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमवेत २ जुलै रोजी अभ्यास भेट
मुंबई, दि. 30 : कर्नाटक विधानपरिषदेची विनंती अर्ज समिती आणि सभागृह समिती मंगळवार, दिनांक 2 जुलै, 2024 रोजी मुंबई येथे…