मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर, दि.०६, (विमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली…
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ८.१३% टक्के दराने परतफेड
मुंबई, दि. १३: राज्य शासनामार्फत ८.१३% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची १३ जानेवारी, २०२५ पर्यंत देय असलेल्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांच्या वतीने अभूतपूर्व स्वागत
नागपूर, दि. १५ : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर येथे आगमनप्रसंगी नागपूरकरांनी विमानतळावर अलोट गर्दी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे…