सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मुलाखत

मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात सांगलीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ सांगली जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल आहे.सांगलीचे जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी,मतदार जनजागृती,कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माहिती दिली आहे.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *