२७-मुंबई उत्तर पश्चिम, २६-मुंबई उत्तर मतदारसंघाकरीता निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरीता राजकुमार चंदन, किरण छत्रपती खर्च निरीक्षक

मुंबई, दि. २९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाकरीता भारत निवडणूक आयोगाने भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी राजकुमार चंदन आणि किरण के. छत्रपती यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत आज आढावा घेतला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे.

या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, आयकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, खर्च विभागाचे नोडल अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेत त्यांनी केलेल्या तयारीची माहिती करून घेतली. राजकीय पक्ष, उमेदवारांनी करावयाच्या निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे, मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देश दिले.

खर्च निरीक्षकांची नागरिक भेट घेऊ शकतात. त्यांचा संपर्क क्रमांक असा : श्री. राजकुमार चंदन (मोबाईल क्रमांक – 93214-05417) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, तर श्री. किरण के. छत्रपती (मोबाईल क्रमांक – 8928571922) यांच्याकडे विधानसभेचे मतदारसंघ 164- वर्सोवा, 165अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्वच्या खर्च निरीक्षणाशी संबंधित समस्यांबाबत तक्रारींसाठी संपर्क साधू शकतात, असे आवाहन खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक श्री. चंदन, श्री. छत्रपती यांनी केले आहे.

०००

२६मुंबई उत्तर मतदासंघाकरीता दीपेंद्रकुमार निवडणूक खर्च निरीक्षक

मुंबई, दि. २९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेचे अधिकारी दीपेंद्रकुमार यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे विधानसभेचे 160-कांदिवली पूर्व, 161 चारकोप आणि 162- मालाड पश्चिम या मतदासंघांचे कामकाज असेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांचा मोबाईल क्रमांक 8928567686 असा आहे. खर्च विभागाचे निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी 26- मुंबई उत्तर मतदारसंघाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आज घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, खर्च पथकाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश निरीक्षक श्री. दीपेंद्रकुमार यांनी दिले.

०००

२६मुंबई उत्तर मतदासंघाकरीता नेहा चौधरी निवडणूक खर्च निरीक्षक

मुंबई, दि.२९: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 26- मुंबई उत्तर मतदासंघांकरीता भारतीय राजस्व सेवेच्या अधिकारी नेहा चौधरी यांची खर्च विभागाच्या निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

श्रीमती चौधरी यांच्याकडे विधानसभा मतदारसंघ 152 बोरिवली, 153 दहिसर आणि 154 मागाठाणे) साठी खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 9372791082 असा आहे. खर्च विभागाच्या निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी आज 26- मुंबई उत्तर मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देवरे यांच्यासह पोलिस उपायुक्त, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, खर्च पथकाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवून नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित सर्व विभागांनी सतर्क राहावे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व नि:पक्ष होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही निर्देश निरीक्षक श्रीमती चौधरी यांनी दिले.

०००

दीपक चव्हाण/ वि.सं.अ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *