विभागीय आयुक्तालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

अमरावती, दि. २० : मराठी पत्रकारितेचे जनक, ‘दर्पणकार’, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अपर आयुक्त सुरज वाघमारे, संजय जाधव, उपायुक्त रवींद्र हजारे, संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *