राज्यातील १०० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचा उद्या होणार प्रारंभ – मंत्री मंगल प्रभात लोढा

            मुंबईदि. १२ : सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातराज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. उद्या १३ मार्च २०२४ रोजी राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवारकौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या कौशल्य विकास केंद्रांचा उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीने मेघदूत या शासकीय निवासस्थानी सकाळी ११ वाजता होईल. 

            महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापनेसाठी कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांनी पुढाकार घेतला आहे. “पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे देखील प्रशिक्षण मिळायला हवे. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या युवक – युवतींना सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरु केलेले कौशल्य विकास केंद्र महत्वाची भूमिका बजावतील. या मार्फत राज्यात किमान २०,००० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात  येईल.

           बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवरील कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन युवकांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमांची निर्मिती देखील केली जाईल. पहिल्या टप्प्यात १०० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु होत आहे. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरु करण्याचे ध्येय आम्ही पूर्ण करू!” असे  मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

            नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 4.0 अंतर्गत जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधिन राहून महाविद्यालयामध्ये हे कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. युवक – युवतींना रोजगारासाठीत्यांच्या करियरसाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण या माध्यमातून प्रदान करण्यात येणार आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *