पॅराग्वे प्रजासत्ताकचे अध्यक्ष सँटियागो पेना यांचे मुंबई येथून प्रयाण

मुंबई, दि. ४ : पॅराग्वे प्रजासत्ताकचे अध्यक्ष सँटियागो पेना यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विशेष विमानाने प्रयाण झाले.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पॅराग्वेतील भारतीय राजदूत पियुष सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सीमा व्यास, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीत सिंह दहिया, सचिव संजय दशपुते, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

पॅराग्वेचे अध्यक्ष यांनी शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून दोहा येथे प्रयाण केले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *