बुलढाणा, दि. २५ : भारताचे दिवंगत माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील समाधीस्थळावर जाऊन केंद्रीय आयुष,आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिवादन केले.
भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील “सदैव अटल” या समाधीस्थळावर आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळीच केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
0000
The post माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले अभिवादन first appeared on महासंवाद.