जळगाव, दिनांक 6 नोव्हेंबर (जिमाका वृत्त) : मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मतदार जनजागृती रथाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखविली. व्हाईस ऑफ मीडिया व मंगळ ग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर जिल्हाधिकारी भिमराज दराडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले, जिल्हा सहाय्यक नियोजन अधिकारी राहुल इधे , जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जैन उद्योग समूहाचे मीडिया डायरेक्टर अनिल जोशी, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, ग.स पतपेढीचे संचालक राम पवार, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, अजय भामरे, ज्येष्ठ सल्लागार विवेक अहिरराव, उमेश धनराळे, मिलिंद पाटील, जयंतलाल वानखेडे, बापूराव ठाकरे, शरद कुलकर्णी, दिनेश नाईक, दयाराम पाटील, जगदीश पाटील, उमाकांत ठाकूर, राहुल पाटील, किरण चव्हाण, संजय पाटील, हेमंत वैद्य आदी उपस्थित होते. दरम्यान मतदार जनजागृती रथ जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरून लोकांना मतदानाबाबत जागृती करणार आहे.
या रथाच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे गीत-संगीताच्या सहाय्याने आवाहन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हाईस ऑफ मीडियाने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. या मतदार जनजागृती रथामुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे. या उपक्रमाचा आदर्श घेत इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती रथ या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. रथाच्या माध्यमातून “ तू लढला नाहीस तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस”, “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” आदी मतदारांना उद्देशून घोष वाक्य यावर आहेत.
0 0 0 0 0 0
The post मतदार जनजागृती रथाला जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखविला हिरवा झेंडा first appeared on महासंवाद.