मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

मुंबई, दि. ०२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, तसेच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सर्वश्री संतोष बांगर, आशिष जयस्वाल आदी मान्यवरांनीही अभिवादन केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *