पीक प्रात्यक्षिकासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

मुंबई दि. ३० : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. चालू वर्षी हरभरा, गहू,  जवस , करडई, भुईमुग,  व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार  आहेत. पीक प्रात्यक्षिके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणा-या बियाण्याचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे.

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने  करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर  दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ पर्यंत बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *