श्रीसद्गुरु नारायण महाराजांचं निधन ही अध्यात्मिक, पुरोगामी चळवळीची हानी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण आदरांजली

मुंबई, दि. 11 :-  “पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथील आदरणीय श्रीसद्गुरु नारायण महाराज यांचं निधन ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. अध्यात्माच्या माध्यमातून लोकजागृती, लोकजागृतीतून लोकचळवळ, लोकचळवळीतून सामाजिक सुधारणा, पुरोगामी विचार गावोगावी पोहोचवणाऱ्या श्रीसद्गुरु नारायण महाराजांचे विचार आणि सेवाकार्य सर्वजण मिळून पुढे नेणं. सामुदायिक शेती, सामुदायिक विवाह, सामुदायिक श्रमदान, व्यसनमुक्तीचे त्यांचे कार्य अखंडीतपणे कायम ठेवणं हीच श्रीसद्गुरु नारायण महाराजांना खरी आदरांजली ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आदरांजली वाहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *