मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन

सातारा, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी नवीन शासकीय विश्रामगृह सर्व सोयीसुविधांसह सज्ज ठेवावे, असे निर्देश दिले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नवीन विश्रामगृहाच्या इमारतीची पाहणी केली.  ते म्हणाले, सातारा शहरातील सदर बाजार येथे ही एक देखणी वास्तू निर्माण झाली आहे. या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि इमारतीची देखभाल योग्य करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

असे आहे नवीन शासकीय विश्रामगृह…

सातारा येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले असून या ठिकाणी नवीन विश्रामगृह बांधण्यात आले आहे. यासाठी १३ कोटी १२ लाख ७६ हजार १९४ रुपये खर्च आला. यामध्ये मल्टीपर्पज हॉल, साधारण कक्ष-५, डायनिंग व किचन, स्वागत व प्रतिक्षा कक्ष, एव्ही रुम, पैंट्री, स्टोअर रुम, व्हीव्हीआयपी सुट-१ व्हीआयपी सुट २ कॉन्फरन्स रुम व स्टोअर रुमसह आकर्षक विद्युत रचना, प्रोजेक्टर, ऑडियो व्हिडिओ सिस्टीम, अद्ययावत फर्निचर, सर्व रुममध्ये टेलिव्हिजन आदी सुविधा उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *