मुंबई, दि.२३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. २८ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या अधिव्याख्याता/सहायक प्राध्यापक (शुश्रूषा सेवा), महाराष्ट्र वैद्यकीय व संशोधन सेवा, गट-ब, या संवर्गाच्या चाळणी परीक्षेची प्रथम उत्तरतालिका दि. ९ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यावर उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या.
या संवर्गाच्या प्रथम उत्तरतालिकेवर उमेदवारांकडून कोणत्याच हरकती प्राप्त न झाल्यामुळे दि.९ फेब्रुवारी, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली प्रथम उत्तरतालिका हीच अंतिम उत्तरतालिका म्हणून ग्राह्य धरण्यात येत असल्याचे आयोगाने कळविले आहे.
00000
राजू धोत्रे/विसंअ