खरीप हंगाम २०२३ च्या पीक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर

मुंबई, दि. १६  : राज्यात खरीप हंगाम सन २०२३ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन २०२३ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल कृषी आयुक्त  रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे जाहीर करण्यात आले.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होण्यास मदत होते. शेतकरी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळू शकते व त्यामुळे राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये शेतकरी चंद्रकांत रघुनाथ म्हातले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच भात आदिवासी गटामध्‍ये श्रीमती शेवंताबाई काशिनाथ कडाळी या महिला शेतकऱ्याने प्रथम क्रमांक मिळविला. बाजरी सर्वसाधारण गटामध्‍ये पुणे जिल्‍ह्याच्‍या श्रीमती ताराबाई दौलत बांदल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सोयाबीन सर्वसाधारण गटामध्‍ये कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील बाळासाहेब पंडितराव खोपकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

बक्षीसाचे स्वरूप : १.राज्यस्तरीय प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम रु. ५०,०००/-

२. राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ४०,०००/-

३.राज्यस्तरीय तृतीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. ३०,०००/-

स्पर्धेचा निकाल असा:  उत्पादन क्विंटल / हेक्टरमध्ये देण्यात आलेले  आहे.

00000

पिकस्पर्धा प्रेसनोट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *