२७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महिला, युवा व दिव्यांग विशेष संचलित केंद्र सज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी

मुंबई, दि. १९ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील 27-  मुंबई उत्तर पश्चिममधील 6 विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी 8 हजार 361 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच या विधानसभा मतदारसंघात महिला, युवा व दिव्यांग विशेष संचलित केंद्रे देखील सज्ज झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

27 मुंबई उत्तर पश्चिम अंतर्गत 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव, 164- वर्सोवा, 165- अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून या सहा मतदारसंघामध्ये 1 हजार 753 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 240 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून 7 हजार 361 इतक्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याचबरोबर मतदानाच्या दिवशी 828 वाहने निवडणूक यंत्रणेत दाखल करण्यात आली असून मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहे.

लोकशाहीच्या या उत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत परिपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी आज जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व, आणि अंधेरी पश्चिम या मतदारसंघात मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 27- मुंबई उत्तर पश्चिम मधील मतदान केंद्र देखील सज्ज करण्यात आली आहे. यावेळी इतर मतदान केंद्रांबरोबर महिला, युवा व दिव्यांग विशेष संचलित केंद्र हे आकर्षणाचा विषय ठरणार आहे. मतदारांना मतदानाचा सुखद अनुभव देण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य नियोजन करण्यात आले असून 20 मे 2024 रोजी जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदारसंघातील मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन देखील निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी केले आहे.

ही आहेत महिला संचलित केंद्र

1) 158 जोगेश्वरी पूर्व- एकूण मतदार- 676 असून मतदान केंद्र क्रमांक -269 कनोसा हायस्कूल, महाकाली गुफा रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-93 हे केंद्र असणार आहे.

2)159 दिंडोशी- एकूण मतदार-  1405 असून मतदान केंद्र क्रमांक- 226 निवारा स्कूल, तळमजला, रुम न. 7, अर्बन निवारा कौन्सिल कॉलनी, अरुणकुमार वैद्य मार्ग, गोरेगाव पूर्व मुंबई-65

3)163 गोरेगाव- एकूण मतदार- 718 असून मतदान केंद्र क्रमांक- 194 जवाहर हायस्कूल, तळमजला, रुम नंबर 2, महात्मा गांधी रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई-104

4)164-  वर्सोवा- एकूण मतदार- 511 असून मतदान केंद्र क्रमांक- 208 चिल्ड्रन्स वेल्फेअर हायस्कूल, रुम नंबर 1, यारी रोड, वर्सोवा व्हीलेज, अंधेरी पश्चिम, मुंबई-61

5)165- अंधेरी पश्चिम- एकूण मतदार- 739 असून मतदान केंद्र क्रमांक- 69 उशा मित्तल इन्टिरुट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एसएनडीटी वुमन्स युनिव्हर्सिटी

6)166 अंधेरी पूर्व- एकूण मतदार- 1018 असून मतदान केंद्र क्रमांक- 63 प्रायमरी ॲकेडमी स्कूल, तळमजला, स्टील्ट डी, मरोळ रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-59

युवा संचलित केंद्र

1)158 जोगेश्वरी पूर्व- एकूण मतदार- 1162 असून मतदान केंद्र क्रमांक -79 सेंट झेवियर्स हायस्कूल, पूनमनगर, महाकाली गुफा रोड, अंधेरी पूर्व.

2)159 दिंडोशी- एकूण मतदार- 792 असून मतदान केंद्र क्रमांक – 32 अनुदत्त विद्यालया, इंग्लिश मीडियम स्कूल, तळमजला, रुम नंबर 16, अकुर्ली रोड, क्रांतिनगर, कांदिवली पूर्व, मुंबई- 01

3)163 गोरेगाव- एकूण मतदार- 870 असून मतदान केंद्र क्रमांक- 129 शंकरधाम केळवाणी मंडळ जे. एम. पटेल कॉलेज ऑफ कॉमर्स रुम नंबर 01, महात्मा गांधी रोड, गोरेगाव, मुंबई-04

4)164 वर्सोवा- एकूण मतदार- 1134 असून मतदान केंद्र क्रमांक- 210 चिल्ड्रन्स वेल्फेअर हायस्कूल, रुम नंबर 1, यारी रोड, वर्सोवा व्हीलेज, अंधेरी पश्चिम मुंबई-61

5)165 अंधेरी पश्चिम- एकूण मतदार- 889 असून मतदान केंद्र क्रमांक- 250 जमुनाबाई नर्से स्कूल नॉर्थ साऊथ रोड, नंबर 7 जुहू- विले पार्ले रोड, मुंबई-49

6)166 अंधेरी पूर्व- एकूण मतदार- 673 असून मतदान केंद्र क्रमांक- 163 श्री राम लक्ष्मी विद्यामंदिर तळमजला, रुम नंबर 1, मोगरा व्हीलेज रोड, अंबोली लेव्हल क्रॉसिंग, अंधेरी पूर्व, मुंबई-69

दिव्यांग विशेष संचलित केंद्र

1)158 जोगेश्वरी पूर्व- एकूण मतदार- 787 असून मतदान केंद्र क्रमांक – 78 अस्मिता विद्यालय भांडारकर वाडी, अलियावर जंग मार्ग, जोगेश्वरी पूर्व मुंबई – 60

2)159 दिंडोशी- एकूण मतदार- 715 असून मतदान केंद्र क्रमांक – 209 मुंबई पब्लिक स्कूल दिंडोशी कॉलनी मराठी स्कूल नंबर 1, तळमजला.

3)163 गोरेगाव- एकूण मतदार- 1384 असून मतदान केंद्र क्रमांक- 228 विवेक विद्यालय नॉथ साईड विंग, तळमजला, रुम नंबर 2 सिद्धार्थनगर गोरेगाव, मुंबई-04

4)     164 वर्सोवा- एकूण मतदार- 462 असून मतदान केंद्र क्रमांक- 85 ए.के. हुसेन अलना इंग्लिश मीडिअम स्कूल, लोखंडवाला अंधेरी पश्चिम, तळमजला, मुंबई-53

5)165 अंधेरी पश्चिम- एकूण मतदार- 479 असून मतदान केंद्र क्रमांक- 42 भारती विद्या भवन ए.एच. वाडिया हायस्कूल, जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-53

6)166 अंधेरी पूर्व- एकूण मतदार- 1069 असून मतदान केंद्र क्रमांक- 170 श्री राम लक्ष्मी विद्यामंदिर तळमजला, रुम नंबर 1, मोगरा व्हीलेज रोड, अंबोली लेव्हल क्रॉसिंग, अंधेरी पूर्व, मुंबई-69

मी बजावला मतदानाचा हक्क, आपणही बजवावा मतदानाचा हक्क

भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे. या अधिकारामुळे आपण देशात सक्षम लोकशाही उभारू शकतो. आणि आपल्या देशाची संयुक्त राष्ट्रसंघात एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो. त्यामुळे देशातील एक जबाबदार नागरिक म्हणून मी मतदानाचा हक्क टपाली सेवेने बजावला आहे. आज तुम्ही देखील आपला मतदानाचा हा हक्क बजवावा, असे आवाहन करते.

निरपेक्ष आणि निर्भिड वातावरणात आपल्याला मतदान करण्याचा सुखद अनुभव मिळावा ही बाब विचारात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीही उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर मतदारांना मतदानाची सुखद अनुभूती मिळावी यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून मतदान केंद्रांची उभारणीही करण्यात आली आहे. मतदारांना सावलीसाठी व बसण्याची जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम कार्यालयात सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी सांगितले.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *