आता जळगाव जिल्ह्यात प्रत्येक आठवडी बाजारात ‘मतदार सुविधा केंद्र’; ८ मे पर्यंत सुविधा उपलब्ध

जळगाव, दि. 22 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी ‘मतदार सुविधा केंद्र’ स्थापन केले जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदान विषयक सर्व माहिती द्यायची आहे.

मतदानापूर्वी आपले नाव मतदार यादीत कसे बघायचे, स्लिप कशी काढायची, पुराव्यासाठी 12 पैकी कोणतेही एक असेल तर ते गृहीत धरले जाते. याबाबतही त्यांना अवगत करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सुविधा केंद्र 8 मे पर्यंत उभारले जाणार आहेत.

मतदान सुविधा केंद्र उभारून जनजागृती बाबतचे आदेश सुरु केल्यानंतर पारोळा, जळगाव, चोपडा येथील रविवार आठवडे बाजारात सुविधा केंद्र उभारून मतदारांना सविस्तर माहिती दिली.

याबाबत ०३-जळगांव लोकसभा मतदार संघासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. तसेच दिनांक १३ मे, २०२४ रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे.

मतदार सुविधा कक्ष स्थापन करून त्याद्वारे बाजारात येणाऱ्या सर्व मतदारांना निवडणूक विषयक माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. त्यात मतदान केंद्राचा तपशिल, मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक शोधुन देणे तसेच त्यासाठी उपयुक्त असलेले ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ बाबत मतदारांना माहिती देणे, मतदारांना मतदानासाठी आवश्यक असलेले १२ पुरावे कोण-कोणते आहेत त्याची माहिती देण्याबाबत जनजागृती करायची आहे.

0 0 0 0 0 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *