सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांच्या ‘ये जिंदगी उसी की है’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांची सुरेलसुमधुर मैफल “ये जिंदगी उसी की है” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ६ मार्च, २०२६ रोजी, रात्री ८.३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहृ विलेपार्ले येथे करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांचा समावेश आहे. यामध्ये गायक म्हणून प्राजक्ता सातर्डेकर, जय आजगावकर, सौम्या वर्मा, सुधाकर शानभाग आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून निवेदक म्हणून मंदार खराडे काम पाहत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून विलेपार्ले परिसरातील रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक सुमधुर मैफलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

 

0000

 

संजय ओरके/वि.सं.अ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *