मुंबई, दि. १ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथे दुपारी १.३५ वाजता आगमन झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, महापौर रितू तावडे, आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, प्रवीण दरेकर, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.
००००