सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रथमच बँड महोत्सवाचे आयोजन – मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई दि. १३ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यंदा प्रथमच बँड महोत्सवाचे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान ॲम्फिथिएटर, बँड स्टॅन्ड वांद्रे पश्चिम, मुंबई या ठिकाणी आयोजन करण्यात येत आहे.

या बँड महोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध बँड पथक सहभागी होणार असून हा आगळावेगळा बँड महोत्सव प्रथमच शासनाच्या वतीने आयोजन करण्यात येत आहे.

मुंबई व पुणे पोलीस बँड पथकांनी देखील यामध्ये सहभाग घेतला आहे. १४ मार्च रोजी मुंबई पोलीस बँड, झंकार ब्रास बँड, किल्ले मच्छिंद्रगड सांगली, मास्टर रफी ब्रास बँड, जळगाव यांचे सादरीकरण होणार आहे तर रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ पुणे पोलीस बँड, पुणे, बाबुलाल ब्रास बँड, नासिक, जनता बँड पाटोदा, बीड, दर्यावर्दी ब्रास बँड, मुळेखंड कोळीवाडा, रायगड तर समारोपाच्या दिवशी सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६, पाईप बँड पुणे – (एसआरपी), वेस्ट बँड, मुंबई, अमर बँड, बारामती, पुणे या बँड पथकाचे सादरीकरण होणार आहे

बँड महोत्सवाची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून या महोत्सवाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

सर्व रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

बँड महोत्सवाला व्यासपीठ देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणे, हाच या भव्य महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

000
संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *