भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री आदिती तटकरे यांची भेट     

छत्रपती संभाजीनगर, दि. १८(जिमाका):  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर, सातारा परिसर येथील भगवान बाबा बालिका आश्रमास भेट देऊन येथील मुलींना मिळणाऱ्या सेवा सुविधांची पाहणी केली.

त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महिला बालविकास अधिकारी गणेश पुंगळे तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय आणि विभागीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, भगवान बाबा बालिका आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी त्यांनी मुलींशी संवाद साधत बालगृहातील अडचणी जाणून घेतल्या. बालगृहातील मुलींनी आपल्या कलागुणातून साकार केलेल्या पेंटिंग्स आणि फ्रेम याविषयी माहिती दिली. उपसभापती डॉ. गोऱ्हे, मंत्री तटकरे यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. मुलीशी संवाद साधून कौतुकाची थाप दिली. यावेळी मंत्री तटकरे यांनी अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकारांशी संवाद साधला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *