मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुशील आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन

नाशिक, दि. १ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशील आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन केले. हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, सुशील पाटील, डॉ. शरद पाटील, डॉ .निधी पाटील व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुसज्ज अशा ऑपरेशन थिएटर व विविध सुविधा कक्षांचेदेखील यावेळी उद्घाटन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *