राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथून प्रयाण

मुंबई, दि. ०१ : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथून विमानाने नवी दिल्ली येथे प्रयाण झाले.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर -पाटणकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, व्हाईस एडमिरल डी. के. गोस्वामी, नेव्ही, तसेच ब्रिगेडियर ज्ञानेंद्र त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *