पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत 

मुंबई दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदलपशुसंवर्धन विभागाचा शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा आणि अंमलबजावणी‘ या विषयावर पर्यावरण व वातावरणीय बदलपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 3, मंगळवार दि. 4, बुधवार दि.5 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यातील पर्यावरण विभागाने महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ग्लोबल वार्मिंगचे परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाहरित महाराष्ट्रनिल ध्वजब्लु फ्लॅग उपक्रमनमामि चंद्रभागा व नमामि गोदावरी हे अभियानतलाव संवर्धनासाठी घेण्यात आलेले निर्णय तसेच अगामी कुंभमेळाच्या अनुषंगाने पर्यावरण दृष्टीने खबरदारी म्हणून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहे अशा महत्वपूर्ण विषयावर  निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडा कसा तयार करण्यात आला आहे याविषयी मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

0000

The post पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत  first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *