मुंबई, दि. १३ : नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींवरील उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
The post नाशिक अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर first appeared on महासंवाद.