मुंबई, दि.५ :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच जिजामाता शहाजीराजे भोसले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
000
The post मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन first appeared on महासंवाद.