महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४
नाशिक, दि.18 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करीता 124- नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 3 मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 400 पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी 8 नवीन मतदान केंद्रे नव्याने तयार करण्यात आली असून भारत निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिली असल्याची माहिती 124 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
1 जुलै 2024 या आर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार 124 – नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र ठिकाणात बदल व 1 हजार 400 पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी 8 नवीन मतदार केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.
असे आहेत मतदान केंद्राच्या ठिकाणात झालेले बदल
अ.क्र.
मतदान केंद्र क्र.
जुने ठिकाण
नविन ठिकाण
ठिकाणात बदल करण्याचे कारण
1
4
मनपा अंगणवाडी, मखमलाबाद, जुन्या पंपिंग. स्टेशन जवळ नाशिक
अभिनव बाल विकास मंदीर, मखमलाबाद ,नाशिक
वादांकित जमिनीचा निर्णय खासगी मालकाच्या बाजूने झाल्याने स्थलांतर
2
88, 89, 90,91
मनपा, मौलाना अबुल कलाम आझाद, उर्दू प्राथमिक शाळा क्र.40, घास बाजार, भद्रकाली, नाशिक
मनपा शाळा क्र.42 मुलतानपुरा, जुने नाशिक, नाशिक
मतदान केंद्रावर जागा अपुरी असल्याने मतदानाचे दिवशी गर्दीचे प्रमाण विचारात घेवून तसेच शाळेतील 4 केंद्रासाठी पत्रा पार्टीशन करावे लागत होते. त्यामुळे नवीन इमारतीत स्थलांतर
3
278
स्वामी विवेकानंद विद्यालय, इंदिरानगर, नाशिक
श्री राजसारथी सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. इंदिरानगर नाशिक येथील सभागृह
मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडील दि. 1 जुलै, 2024 चे पत्राचे निर्देशान्वये मतदारांना मतदान करणे अधिक सुलभ व्हावे म्हणून सहकारी गृह निर्माण सोसायटीमध्ये मतदान केंद्र स्थापन केले आहे
1400 पेक्षा जास्त मतदार संख्या झाल्याने नवीन तयार करण्यात आलेली 8 मतदान केंद्रे
अ.क्र.
जुने मतदान केंद्र क्र.
नवीन तयार केलेले मतदान केंद्र क्र.
ठिकाण
नविन ठिकाण
ठिकाणात बदल करण्याचे कारण
1
167
168
167-मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय. पखाल रोड
168 – त्याच शाळेत दुस-या खोलीत मतदान केंद्र स्थापन केले आहे
सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.729 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
2
223
224 व 225
224-नाशिक मनपा प्राथमिक शाळा क्र. 65, बजरंग वाडी, हॅपी होम कॉलनी
225-अशोका युनिवर्सल स्कूल, नाशिक
सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.785 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
3
226
228 व 229
228-नाशिक
मनपा प्राथमिक शाळा क्र. 65, बजरंग वाडी, हॅपी होम कॉलनी
229-अशोका युनिवर्सल स्कुल, नाशिक
सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.737 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
4
248
251 व 252
251-गांधी नगर, विद्यामंदिर, (पूर्वीची नाशिक मनपा शाळा क्र. 38 व 50) गांधी नगर
252-वेलफेअर क्लब हॉल नाशिक मनपा गांधी नगर सभागृह
सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.911 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
5
256
260 व 261
260-रायन इंटरनॅशनल स्कूल, उजवीकडील इमारत, डी.जी.पी. नगर नाशिक
261- त्याच शाळेत दुस-या खोलीत मतदान केंद्र स्थापन केले आहे
सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.779 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
6
257
262 व 263
262-रायन इंटरनॅशनल स्कूल, उजवीकडील इमारत, डी.जी.पी. नगर-1, नाशिक
263- त्याच शाळेत दुस-या खोलीत मतदान केंद्र स्थापन केले आहे
सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.779 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
7
290
296 व 297
296-नाशिक मनपा शाळा क्र. 83, वडाळा गांव, नाशिक
297-नाशिक मनपा शाळा क्र. 84 व 85, वडाळा गांव, नाशिक
सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.769 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
8
293
300 व 301
300-नाशिक मनपा शाळा क्र. 82, वडाळा गांव, नाशिक
301-नाशिक मनपा शाळा क्र. 84 व 85, वडाळा गांव, नाशिक
सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.840 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
मा.भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांनुसार मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाइल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेवून जाता येणार नाही. त्यामुळे मतदारांनी ओळखपत्र प्रत्यक्ष सोबत आणणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र व्यतिरिक्त खालील पुरावे मा. निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेले आहे.
आधार कार्ड
मनरेगा जॉब कार्ड
बँक / पोष्टा व्दारे जारी केलेले फोटोसह असलेले पासबुक
श्रम मंत्रालय योजने अंतर्गत जारी केलेले विमा स्मार्ट कार्ड
ड्रायव्हींग लायसन्स
पॅनकार्ड
एनपीआर अंतर्गत आरजीआई व्दारा जारी केलेले स्मार्ट कार्ड
भारतीय पासपोर्ट
फोटोसह पेंशन दस्तावेज
केंद्र/राज्य सरकार/लोक उपक्रम/पब्लिक लि. कंपनीव्दारे कर्मचारी यांना जारीकेलेले फोटोसह ओळखपत्र
सांसद/विधायक / विधान परिषद सदस्य यांच्या करिता जारी केलेले ओळखपत्र
भारत सरकारच्या सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे अपंगत्वाचे कार्ड (यूनिक डिसएबिलिटी आय डी)
मतदारांनी आपले मतदार यादीतील नांव शोधण्यासाठी http://electoralsearch.eci.gov.in या वेबसाईटचा वापर करावा. तसेच 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ येथे मतदारांसाठी मतदार मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. या मतदार मदत कक्ष दुरध्वनी क्रमांक 0253-2972124 असा आहे.
ज्या मतदारांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत’ असा चुकीचा संदेश social media वर प्रसारित होत आहे. तथापि अशा प्रकारे कोणत्याही मतदाराला मतदान करता येणार नाही याची मतदारांनी नोंद घ्यावी.
मतदारांनी वरीलप्रमाणे मतदान केंद्रांच्या ठिकाणात झालेल्या बदलांची नोंद घ्यावी, 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत मतदान करावे असे 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चौहान यांनी केले आहे.
0000000
The post १२४- नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणात बदलासह ८ नवीन मतदान केंद्राचा समावेश first appeared on महासंवाद.