गोरेगाव येथे वाहनातून सहा लाखांची रक्कम जप्त

मुंबई, दि. ०४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आचारसंहितेच्या भरारी पथक क्रमांक ८ ने १६३- गोरेगाव येथे वाहन तपासणी केली. या तपासणीदरम्यान, जैन मंदिराजवळील एस. व्ही. रोडवर एका वाहनामध्ये ६ लाख ११ हजार ८२० रुपये रोख रक्कम सापडली.

आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विहित रकमेपेक्षा अधिक रोख रक्कम बाळगल्याबद्दल गोरेगाव पोलिस ठाण्यात रीतसर पंचनामा करून या नोटांच्या तपशीलासह जप्त रक्कम जमा करण्यात आली आहे. यासंदर्भात भरारी पथकातील अधिकारी पुढील कार्यवाही करत आहेत.

०००

The post गोरेगाव येथे वाहनातून सहा लाखांची रक्कम जप्त first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *