मुंबई, दि. 21 : लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे. तथापि, मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया विहित नियमांनुसार काटेकोरपणे केली गेली आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वस्तुस्थिती कळविलेली असून ती खालीलप्रमाणे आहे :
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील एकूण मतदार 9 कोटी 29 लाख 43 हजार 890 होते. 20 ऑक्टोबरपर्यंत 36 लाख 31 हजार 279 मतदारांची निव्वळ वाढ झाली आहे आणि 20 ऑक्टोबर रोजी एकूण 9 कोटी 65 लाख 5 हजार 958 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर, 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसऱ्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (SSR-2024) प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर, वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी उपलब्ध होता आणि या दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली.
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी नियमानुसार योग्य प्रक्रिया अवलंबली आहे. लोकप्रतिनिधी कायदा, 1950, मतदार नोंदणी नियम, 1960 आणि भारत निवडणूक आयोगाच्या 11 ऑगस्ट 2023 च्या पत्रातही मतदार यादीबाबत तरतुदी नमूद केल्या आहेत. या तरतुदींनुसार, फॉर्म क्रमांक 6 सादर करून मतदार यादीतील नाव नोंदले जाऊ शकते आणि फॉर्म क्रमांक 7 सादर करून वगळले जाऊ शकते. फॉर्म क्रमांक 8 सादर करून मतदाराच्या नोंदीमध्ये कोणताही बदल (नाव, पत्ता, बदलणे इ.) करता येईल आणि हे सर्व फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. दावे आणि हरकतींसाठी सात दिवसांची नोटीस देण्याची तरतूद आहे. आक्षेपांचा योग्य विचार केल्यानंतर, मतदार नोंदणी आधिकारी योग्य ते निर्णय घेतात. महाराष्ट्र राज्यातील मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांबाबतची खालील आकडेवारी स्वयं-स्पष्ट आहे.
संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (SSR-2019)
मसुदा मतदार यादी
पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (Electors at Draft Publication of 1st SSR 2019) ( 1-09-18)
अंतिम मतदार यादी
पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2019 (Electors at Final Publication of 1st SSR 2019)
( 31-01-19)
वाढ (Addition)
वगळले
(Deletion)
निव्वळ फरक (Net Difference )
8,44,87,905
8,73,29,910
35,74,067
7,32,062
28,42,005
पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (1ST SSR-2024)
मसुदा मतदार यादी
पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Draft Publication of 1st SSR 2024) ( 23-10-24)
अंतिम मतदार यादी
पहिला संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Final Publication of 1st SSR 2024) ( 23-01-24)
वाढ (Addition)
वगळले (Deletion)
निव्वळ फरक (Net Difference)
9,08,32263
9,12,44679
24,33,766
20,21,350
4,12,416
दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (2ND SSR-2024)
मसुदा मतदार यादी
दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Draft Publication of 2st SSR 2024) ( 06-08-24)
अंतिम मतदार यादी
दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 (Electors at Final Publication of 2nd SSR 2024)
( 30-08-24)
वाढ (Addition)
वगळले
(Deletion)
निव्वळ फरक (Net Difference )
9,36,75,934
9,53,74302
20,78,081
3,79,713
16,98,368
0000
Press Note Dated: 21.10.2024
There was allegation of registration of electors around 10,000 per Assembly Constituency after Lok Sabha Election by Some Political Parties. The procedure of updating of Electoral Roll is done strictly as per prescribed rules. The factual position related to the issues is as follows :
At the time of Lok Sabha Elections, total electors in State were 9,29,43890. There is net increase of 36,31,279 electors till 20th Oct and electors on 20th Oct are 9,65,05958. After Lok Sabha Elections, 2024 Draft Electoral Roll was published on 06-08-2024 during 2ND SSR-2024, Thereafter, period of nearly 14 days was available for submitting claims and objections as per schedule and after due consideration of these claims and objections, final Electoral Roll was published.
Before and after SSR, proper procedure of addition and deletion has been followed by the concerned Electoral Registration Officers for updating Electoral Roll. Provisions regarding addition and deletion in Electoral Roll are specified in Representation of People Act, 1950, Electoral Registration Rules, 1960 and also in ECI’s letter dated 11-08-2023. As per these provisions, the name in the voter list can be added by submitting form no 6 and deleted by submitting form no 7, Any change in the voter (name, address, shifting, etc.) can be done by submitting form no 8 and all these forms are available online also. There is provision of seven days’ notice for claims and objections. After due consideration of the objections, the ERO takes the decision. The details about Maharashtra State SSR 2019 SSR -1 2024, SSR – 2 2024 given below and the data is self-explanatory.
SSR-2019,
Electors at Draft Publication of 1st SSR 2019 ( 1-09-18)
Electors at Final Publication of 1st SSR 2019 ( 31-01-19)
Addition
Deletion
Net Difference
8,44,87,905
8,73,29,910
35,74,067
7,32,062
28,42,005
1ST SSR-2024
Electors at Draft Publication of 1st SSR 2024 ( 23-10-24)
Electors at Final Publication of 1st SSR 2024 ( 23-01-24)
Addition
Deletion
Net Difference
9,08,32263
9,12,44679
24,33,766
20,21,350
4,12,416
2ND SSR-2024
Electors at Draft Publication of 2st SSR 2024 ( 06-08-24)
Electors at Final Publication of 2nd SSR 2024 ( 30-08-24)
Addition
Deletion
Net Difference
9,36,75,934
9,53,74302
20,78,081
3,79,713
16,98,368
Press Note given by Office of the Chief Electoral Officer, Maharashtra
————————————–
The post मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम नियमानुसारच first appeared on महासंवाद.