मुंबई, दि. २१ : बेल्जियमचे राजे फिलिप यांच्या भगिनी असलेल्या प्रिन्सेस ऍस्ट्रिड यांच्या नेतृत्वाखाली बेल्जीयम येथील व्यापार – उद्योजकांचे आर्थिक शिष्टमंडळ (बेल्जियन इकॉनॉमिक मिशन) येत्या मार्च महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. यावेळी मिशनचे सदस्य दिल्लीसह मुंबईला भेट देणार असल्याची माहिती बेल्जियमचे मुंबईतील वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी आज येथे दिली.
वाणिज्यदूत फ्रॅंक गिरकेंस यांनी सोमवारी (दि. २१) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
बेल्जियमचा महाराष्ट्र आणि गुजरातशी हिऱ्यांचा मोठा व्यापार आहे. बेल्जियम आता भारताशी लॉजिस्टिक्स, उत्पादन व आरोग्य सेवा क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सेमीकंडक्टर व्यापाराबद्दल देखील चर्चा होऊ शकते असे वाणिज्यदूतांनी सांगितले.
बेल्जियम आरोग्यसेवा क्षेत्रात अग्रेसर असून या क्षेत्रात आपण सहकार्य वाढविणार असल्याचे फ्रॅंक गिरकेंस यांनी सांगितले. भारत युरोप व्यापार वाढविण्याबाबत फेडरेशन ऑफ युरोपिअन बिझनेसेस इन इंडिया (फेबी) काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य वर्धन या क्षेत्रात देखील बेल्जियम महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत व युरोपमधील मुक्त व्यापार धोरण लवकर मंजूर झाल्यास त्याने उभयपक्षी व्यापार दुपटीने वाढेल असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.
Belgian Economic Mission to visit Mumbai : Princess Astride to lead the Mission
Belgium keen to enhance cooperation in logistics, manufacturing and health care
Mumbai, 21st Oct : The Consul of Belgium in Mumbai Frank Geerkens today informed that Belgian Economic Mission to be led by Princess Astride, the sister of King Philippe of Belgium, will visit India in the month of March. He said apart from the existing trade in diamond and other commodities, emphasis will be laid on enhancing cooperation in logistics, manufacturing and healthcare.
The Consul General was speaking to Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan Mumbai on Monday (Oct 21).
The Consul General said Belgium has a large diamond trade with Maharashtra and Gujarat. Stating that Belgium is the hub of healthcare, he said efforts are being made to increase cooperation in this field also.
He informed the Governor that the Federation of European Businesses in India (FEBI) is working to increase India-Europe trade. He said that Belgium is also cooperating with the Skill agency in Maharashtra to promote skill development.
Maharashtra Governor Radhakrishnan expressed the hope that free trade agreement between India and Europe when signed will double the multilateral trade.
0000
The post बेल्जियमचे आर्थिक शिष्टमंडळ मुंबई दौऱ्यावर येणार : बेल्जियम वाणिज्यदूतांची माहिती first appeared on महासंवाद.