आपले सरकार व पी. जी. पोर्टलवरील कामकाजासाठी वेळ राखून ठेवावा – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. ३० : आपले सरकार व पी. जी. पोर्टलवरील तक्रारी सोडविण्यासाठी दैनंदिन कामकाजामध्ये रोज २० मिनिटे वेळ राखून ठेवावा, असे  निर्देश मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले. ‘आपले सरकार व ‘पी. जी. पोर्टल राज्यामध्ये प्रभावीपणे राबविण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, येथील समिती सभागृहात ३० सप्टेंबर,२०२४ रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.क्षीरसागर बोलत होते.

प्रशिक्षण देण्यासाठी ई- गव्हर्नन्स तज्ज्ञ देवांग दवे व  शुभम पै (सिल्वर टच एजन्सी) हे उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर, निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.), उपविभागीय अधिकारी पश्चिम/पूर्व उपनगरे, रजा राखीव तहसीलदार, तहसीलदार महसूल, अपर तहसीलदार, तहसीलदार अंधेरी, बोरीवली व कुर्ला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील व अधिनस्त कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (DIT), एन आय सी चे प्रतिनिधी उपस्थित होते.

ई- गव्हर्नन्स तज्ज्ञ देवांग दवे यांनी ‘आपले सरकारपी. जी. पोर्टल च्या अनुषंगाने सविस्तर प्रशिक्षण व ‘आपले सरकार’ व ‘पी. जी. पोर्टल’ वापरणेबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली . तसेच पोर्टलचा वापर करतांना येणाऱ्या अडचणी, समस्या याबाबत जाणून घेवून या समस्यांचे निराकरणही यावेळी ई-गव्हर्नन्स तज्ज्ञ श्री. दवे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *