मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २७ : राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधत राज्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

खानदेशच्या विकासाची तळमळ असणारा सुपुत्र महाराष्ट्राने गमावला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘ज्येष्ठ नेते पाटील यांनी दाजीसाहेब म्हणून आदराचे स्थान मिळवले होते. वडीलांकडून राजकारण, समाजकारणाचा वारसा मिळालेल्या, उच्चशिक्षित अशा ज्येष्ठ नेते पाटील यांची वाटचाल सरपंच ते राज्याचे मंत्री अशी चढत्या आलेखाची राहीली आहे. विधानसभेचे ते दीर्घकाळ सदस्य राहीले होते. या काळात त्यांनी महत्वाच्या विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. कृषी, सहकार, सिंचन, ग्रामविकास, संसदीय कार्य अशा क्षेत्रांतील अभ्यास, अनुभवाचा उपयोग त्यांनी राज्याच्या विकासासाठी केला. ज्येष्ठे नेते पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ, मार्गदर्शक असे नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे झालेला आघात सहन करण्याची ताकद पाटील परिवाराला मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे

ही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *