राज्यपालांच्या उपस्थितीत जैन संघ रथयात्रा रवाना

मुंबई, दि.22:- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी विविध जैन संघांनी आयोजित केलेल्या रथयात्रेला प्रार्थना समाज मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा,  भक्तियोग आचार्य यशोविजय महाराज, अचल गच्छाधिपती कलाप्रभसागर सुरीश्वर महाराज तसेच जैन संघांचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

तीर्थंकर भगवान महावीर यांनी समाजाला अहिंसा, सत्य आणि करुणा ही तत्त्वे दिली आहेत. ही रथयात्रा भगवान महावीरांच्या शिकवणीची आठवण करून देणारी आहे. भगवान महावीरांची तत्वज्ञान आज विशेष प्रासंगिक आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

रथयात्रेत सहभागी झालेल्या जैन संघाचे अभिनंदन करुन ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

00000

Governor flags off Jain Sangh Rath Yatra

Mumbai, September 22: Maharashtra Governor C P Radhakrishnan flagged off the Rath Yatra organized by various Jain Sanghs of South Mumbai from Prarthana Samaj, Mumbai on Sunday (22 Sept).

Minister of Skills development, Employment, Entrepreneurship and Innovation Mangal Prabhat Lodha, Bhaktiyog Acharya Yashovijay Maharaj, Achal Gachhaadhipati Kalaprabhsagar Surishvar Maharaj,  Jain Munis and Members of the Jain Sangh were present.

The Governor said the Rath Yatra serves as a reminder of the noble teachings of Bhagwan Mahavir, whose wisdom continues to guide humanity even today.

He said Bhagwan Mahavir, the 24th Tirthankara, gifted invaluable principles of non-violence, truth, and compassion. He called upon the people to take these teachings to the new generation

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *