राज्यातील विविध ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ई – उद्घाटन

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न;

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची उपस्थिती

नंदुरबार, दि. २० (जिमाका): कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत देशभरात विविध महाविद्यालयांसह जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली असून या केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

नंदुरबार येथील जिजामाता शैक्षणिक संस्था, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली शेठी, कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे तसेच महाविद्यायाचे प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

जिल्ह्यातील या १५ महाविद्यालयांमध्ये उद्घाटन..

जिल्ह्यातील महिला मंडळ संचलित शहादा कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (शहादा), महाराज जे.पी. वळवी कला, वाणिज्य व व्ही. के. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय (धडगाव), महात्मा फुले एम एस डब्ल्यू व मातोश्री जवेरीबेन मोतीलाल तूरखीया बी.एस. डब्ल्यू महाविद्यालय (तळोदा), जे.जी. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय (नंदुरबार), के.डी. गावित. बी.एस. सी. नर्सिंग महाविद्यालय (पथराई ता. नंदुरबार), के.डी. गावित फिजिओथेरपी महाविद्यालय (पथराई ता. नंदुरबार), वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शहादा), वेलीमाता कनिष्ठ महाविद्यालय ( वेली ता. अक्कलकुवा), श्री. काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (नंदुरबार), जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय (नंदुरबार), आदिवासी सेवा सहायक आणि शिक्षण प्रसारक संस्था, वरिष्ठ महाविद्यालय (नवापूर), जिजामाता शैक्षणिक संस्था, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (नंदुरबार), पी.एस.जी.व्ही.पी. मंडळ डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय (शहादा), ग्राम विकास संस्था कला महाविद्यालय (बामखेडा ता शहादा), रूलर फॉउंडेशन शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय (सोरापाडा ता. अक्कलकुवा) अशा एकूण 15 महाविद्यालयात या केंद्राचे उद्घाटन झाले.

०००

जिल्ह्यातील १३ कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन

अमरावती, दि. २० (जिमाका) : राज्यातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते वर्धा येथून करण्यात आले. यात जिल्ह्यातील 13 केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.

शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील सी. व्ही. रमण सभागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयवंत पुसदेकर, सदस्य सुभाष बनसोड, प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे, डॉ. दिनेश खेडकर, कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

श्री. पुसदेकर यांनी केंद्राचे उद्घाटन करीत असल्याचे जाहिर केले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासासाठी दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. यात वेब डिझाईन आणि इंस्ट्रुमेंटेशन प्रोग्रामचा समावेश असल्याचे सांगितले. या दोन्ही अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संस्थेचे नाव मोठे करावे, असे आवाहन केले. श्री. खेळकर यांनी कौशल्य विकास केंद्रातील सर्व प्रकियांची माहिती दिली. अभ्यासक्रम हे जागतिक पातळीवरील मान्यताप्राप्त असल्याने याचे महत्व असल्याचे सांगितले. यात मर्यादीत प्रवेश दिला जाणार आहे, तसेच जाणीवपूर्वक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी यात आवड असल्यास प्रवेश घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला दिप प्रज्ज्वलन करून गाडगे महाराज आणि पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रा. रेखा मग्गीरवार यांनी सूत्रसंचालन केले. दिनेश खेडकर यांनी आभार मानले.

अमरावती येथील बबनराव देशमुख महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, श्री शिवाजी सायंस कॉलेज, जी. एच. रायसोनी युनिर्व्हसिटी, महिला महाविद्यालय, सुशीला सुर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हॉन्समेंट, बडनेरा येथील राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, वरुड येथील ज्योशबा सिव्हील सर्विसेस महाविद्यालय, चांदूर बाजार येथील जी. एस. टोम्पे कॉलेज, चिखलदरा येथील आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, तिवसा येथील वायडीव्हीडी आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, फातिमा कॉलेज ऑफ नर्सिंग येथील केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

०००

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *