राजधानीत सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

नवी दिल्ली, ३१ : देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त निवासी आुयक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी कोपर्निकस मार्ग येथील महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने निवासी आुयक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपत्ते यांनी इंदिरा गांधी व वल्लभ भाई पटेल यांच्या कार्याचा व जीवनप्रवासाचा परिचय  उपस्थितांना करुन ‍दिला.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *