उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले श्री गणेशाचे दर्शन

मुंबई, दि. १४ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड, त्यांच्या पत्नी डॉ सुदेश धनखड यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी उपराष्ट्रपती श्री.  धनखड, त्यांच्या पत्नी डॉ सुदेश यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धनखड दाम्पत्याचे स्वागत केले तसेच त्यांचा श्री गणेशाची मूर्ती देऊन सत्कार केला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती लता, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी श्रीमती वृषाली आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *