केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे घेतले दर्शन  

मुंबई, दि.९ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे व येथे ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ या संकल्पनेवर आधारित साकारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार आशीष शेलार यांनी मंडळाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांना स्वामी विवेकानंद यांची मूर्ती भेट म्हणून दिली.

केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांच्या हस्ते गणपतीची पूजा करण्यात आली. यावेळी  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मंडळाचे सल्लागार तथा आमदार आशीष शेलार, मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत, श्रीमती प्रतिमा शेलार, श्रीमती रचना राऊत यांच्यासह अन्य मान्यवरांनी  गणरायाचे दर्शन घेतले.

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वांद्रे पश्चिम येथे साकारलेल्या 28 व्या गणेशोत्सवात यावर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. यामाध्यमातून ‘काश्मीर ते कन्याकुमारी एक भारत’असा सांस्कृतिक संदेश दिला जात आहे.

०००

संजय ओरके/वि.सं.अ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *