मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
गारगाई धरणाच्या वन्यजीव व पर्यावरण विषयक परवान्यांना मंजुरी
मुंबई, दि.१७ :- मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना…
शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा- पालकसचिव, राजगोपाल देवरा
जिल्हास्तरीय कामकाजाबाबत घेतला आढावा, सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज करण्याच्या केल्या सूचना कोल्हापूर, दि.२१ : सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र…
‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी इच्छुक प्रशिक्षकांना ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २६ : ‘मिशन लक्ष्यवेध’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या खेळांसाठी…