मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध
मुंबई, दि.१४ :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४…
कोल्हापुरात १० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून होणार मतदार जनजागृती
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सन 2024 साठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची…
केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जळगावमध्ये 25ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा
विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना; जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण जळगाव, दिनांक 20 ऑगस्ट (जिमाका वृत्त) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत…