मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
इलेक्टोरल रोल चंद्रपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
चंद्रपूर, दि. ६ : मतदान करण्यासाठी पात्र व्यक्तिचे नाव मतदार यादीत असणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील मतदारांचे नाव असलेली इलेक्टोरल…
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी पदाचा निकाल जाहीर
मुंबई, दि. 05: महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील 283 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी…
बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ६, १०, ११ आणि १२ मे रोजी पोस्टल मतदान करता येणार
बीड, दि. 5(जीमाका) : बीड लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणारे 230 बीड विधानसभा मतदारसंघात दि.6, दि.10, दि.11 आणि दि.12 मे रोजी पोस्टल मतदान…