मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
नवी दिल्लीतील ‘मऱ्हाटी एम्पोरियम’चा कायापालट करणार -उद्योगमंत्री उदय सामंत
नवी दिल्ली दि. २३: नवी दिल्ली येथील महाराष्ट्राच्या मऱ्हाटी एम्पोरियमचा सर्वसमावेशक विकास करून तेथे महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व परंपरेचे प्रतिबिंब…
कृषि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. 9 : कृषि अधिकाऱ्यांच्या कामामध्ये अधिक गतिमानता येण्यासाठी त्यांना विविध सुविधा देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक आहे. कृषि अधिकाऱ्यांनीही…
राज्यातील सार्वजनिक विद्यापीठातील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. ६ : राज्यातील सार्वजनिक अकृषि विद्यापीठांमधील अध्यापकांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निपक्ष आणि संतुलित व्हावी, यासाठी कुलपती तथा…