मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
दिग्रस येथील कब्रस्तान विस्तारीकरणाची कारवाई तातडीने करा – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि.3 (जिमाका) : दिग्रस येथी कब्रस्तान फार जुने आहे. तेथील जागा अपुरी पडत असल्याने विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे…
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार
मुंबई, दि. २४: फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला…
जलसंपदा विभागाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा ठेवा -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प तसेच या विभागाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील,…