केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ग्लो गार्डनचे भूमिपूजन

छत्रपती संभाजीनगर, दि. १२ (विमाका) : स्वामी विवेकानंद उद्यानात ग्लो गार्डन विकसित करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. आमदार प्रदीप जैस्वाल, श्री. विनय तिवारी, महानगरपालिकेचे उपायुक्त रणजीत पाटील यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडून ग्लो गार्डन विकसित करण्यासाठी स्वामी विवेकानंद उद्यानात चार एकर जागेचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्लो गार्डन नेत्रदिपक अशी वास्तू या ठिकाणी नागरिकांना पाहण्यासाठी मिळणार आहे. ग्लो गार्डनमुळे हा परिसर विकसित होईल. छोटेमोठे व्यवसायही या माध्यमातून उभे राहणार आहेत. येत्या तीन महिन्यात ग्लो गार्डन तयार होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले.   यावेळी परिसरातील नागरिक, महिला, युवक उपस्थित होते.

 

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *