५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांना नियमित करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. २०: ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना दिले आहेत.

माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी तासिका निदेशकांना नियमित करण्याबाबत मंत्री लोढा यांना पत्राद्वारे विनंती केली होती. यानंतर मंत्री लोढा यांनी या पत्राची तातडीने दखल घेत, संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक चर्चा करून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने सुद्धा या संदर्भात मंत्री लोढा यांची सदर विषयाबाबत भेट घेतली. सद्य:स्थितीत अनेक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये तासिका तत्वावर कार्यरत निदेशकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. तासिका तत्वावर काम करणाऱ्या निदेशकांची ५ वर्षे व त्याहून अधिक काळ ज्यांची सेवा झाली आहे किंवा किमान पात्रता (ITI, CTI, पदविका व पदवी) धारण करतात, त्यांची परीक्षा घेऊन नियमित करण्यात यावे, असे निवेदन महासंघाने दिले होते.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *