सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. ९ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या वर्षासाठी राज्यभरातून एकूण १३० सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १० जून २०२५ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन होण्यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनाप्रमाणे काम करण्याचे निर्देश  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे तसेच  विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. शिरसाट म्हणाले, हा पुरस्कार वितरण सोहळा प्रेरणादायी ठरावा यासाठी प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष द्यावे. कामाच्या नियोजनाप्रमाणे आराखड्याची अंमलबजावणी करावी व दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.

मंत्री संजय शिरसाट यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, स्वच्छता, वाहनतळ व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा यावेळी घेतला.

****

शैलजा पाटील/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *