राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात अभिवादन

मुंबई, दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि निर्वाण दिनानिमित्त आज मंत्रालयाशेजारी उद्यानात महात्मा गांधी स्मारक समितीमार्फत महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

यावेळी सर्वधर्म प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी स्मारक समितीचे सचिव देवराज सिंग, उपाध्यक्ष सुमन पवार, सदस्य प्रा. अमर सिंग, रवी बंगारे, भारत खाडे आणि सर्व धर्माचे धर्मगुरू यांच्यासह कुलाबा मनपा शाळेचे विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

सचिव श्री. सिंग यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्या मार्गावरून चालण्याचा आपण सर्व प्रयत्न करूया, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

यावेळी बौद्ध, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी, जैन, शीख धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील प्रार्थना सादर केली. समृद्धी येवले, रंजीता चव्हाण, हंस तांबे, नैतिक निमोडकर या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्यावर मराठी, हिंदी, इंग्रजीमधून विचार व्यक्त केले.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं/

 

 

The post राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात अभिवादन first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *