सातारा दि. ६: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपोडे बुद्रुक व नांदवळ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपोडे बु. येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेत मजुरांना मतदान हक्क बजावण्या बाबत दिली माहिती. २० नोव्हेंबर होणाऱ्या मतदान प्रक्रीयेचे पटवून देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव यांनी सांगितले.
नांदवळ मध्ये गृहभेटीद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनिस, तलाठी, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) उपस्थिती होते.
०००
The post सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती first appeared on महासंवाद.