ज्येष्ठ कलाकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

मुंबई, दि. १ : दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात  येते. सन २०२२-२३ या वर्षातील  कै. वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कलाकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर देण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

या पुरस्कारासाठी गठीत केलेल्या शोध समितीची बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाराष्ट्राला  कलेचा समृद्ध वारसा लाभला असून राज्यातील कलाकारांनी  विविध क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेचे लौकिक प्राप्त केले आहे. लक्ष्मण श्रेष्ठ हे दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणारे नामवंत कलाकार आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर केल्याने या पुरस्काराची अधिक उंची वाढेल, अशी प्रतिक्रिया मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *