माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधनाने धुळे जिल्ह्याच्या विकासाला समर्पित नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 27 :- “खान्देशचे सुपुत्र, धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील तथा दाजीसाहेबांचे निधन झाल्याचं ऐकून धक्का बसला. राज्याच्या राजकारणात प्रदीर्घ काळ काम करताना दाजीसाहेबांशी सातत्याने संपर्क येत होता. धुळे जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं नेतृत्वं होतं. शैक्षणिक, सामाजिक, सहकारी संस्थांच्या उभारणीतून धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. अक्कलपाडा धरणाच्या निर्मितीतही त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्या निधनानं धुळे जिल्ह्याच्या, खान्देशचा विकासाला वाहिलेलं समर्पित नेतृत्वं हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियाप्रति सहसंवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करुन माजी मंत्री रोहिदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *